खोडद, ता.१९ : ‘‘प्रत्येक पाच किलोमीटरवर वातावरण आणि जमिनीत बदल आढळतो. त्यामुळे आता केळी पिकासाठी ‘एआय’ आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तापमान, हवेचा वेग, वातावरणातील आर्द्रता, पाण्याचे प्रमाण, पाण्यातील घटक व जमिनीतील पाण्याचे प्रमाण आदी बाबींची माहिती एआय तंत्रज्ञानातून मिळणार आहे,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ भरत टेमकर यांनी व्यक्त केले.
मांजरवाडी (ता.जुन्नर) येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवनच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता.१८) शाश्वत केळी उत्पादन व निर्यातक्षम लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्याचे ॲग्रोवन आणि डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे होते.
यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर खोकराळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवदास विधाटे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, कात्रज डेअरीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी कृषी अधिकारी डी.एन.गायकवाड मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे संचालक शिवाजी कांबळे, शाश्वत फार्मिंगचे मंगेश भास्कर, डेक्कन व्हॅली फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष अजय बेल्हेकर, नारायणगाव मंडल कृषी अधिकारी राणू आंबेकर, केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या
माऊली खंडागळे म्हणाले की, "जुन्नर, आंबेगावची माती केळी पिकासाठी अत्यंत पोषक आहे. शेतीमध्ये प्रगती नव्हती तेव्हापासून जुन्नरची केळी भारतासह विदेशातही जात होती. केळी पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून अनुदान दिले जात आहे."
डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वामन यांनी बोलताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील केळीच्या सद्यस्थितीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी रवींद्र थोरात, विजय थोरात, श्याम भोर, शिवाजी कांबळे, सुनील वामन यांचा उत्कृष्ट केळी पीक घेतल्याबद्दल तसेच मनीष मोरडे, डॉ.विशाल थोरात, सुधीर खोकराळे, गणेश पानमंद, जयश्री खंडागळे यांचा उत्कृष्ट दुग्धव्यवसाय केल्याबद्दल ॲग्रोवनच्यावतीने सन्मान करण्यात आला. विनायक मुळे यांनी सूत्रसंचालन केले. गोकूळ कदम यांनी आभार व्यक्त केले.
लवकरच युरोपियन केळी निर्यात
खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर या भागातील ५ हजार केळी उत्पादक शेतकरी डेक्कन व्हॅली फार्मर प्रोडूसर कंपनीद्वारे जोडले जाणार आहेत. सध्या आखाती देशात केळी निर्यात केली जात आहे, लवकरच युरोपियन देशांमध्ये देखील केळी निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
01355
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.