पुणे

महागाईमुळे मूर्तींच्या किमतीत वाढ

CD

खोडद, ता. ३ : खोडद (ता.जुन्नर) येथील मूर्तिकार गणेश जाधव व मंगेश जाधव हे मागील अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती बनवत आहेत. त्यांनी बनविलेल्या मूर्तींची होलसेल आणि किरकोळ स्वरूपात विक्री केली जाते.
मागील वर्षी त्यांनी अडीच हजार मूर्ती तयार केल्या होत्या, मात्र यंदा कच्च्या मालामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने १ हजार ८०० मूर्ती तयार केल्या आहेत. जाधव बंधूंनी घरगुती गणपतीसाठी सव्वा फुटांपासून ते दोन फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्तीची किंमत ६०० रुपयांपर्यंत आहे. दोन फुटांच्या मूर्तीची किंमत ११०० रुपये आहे. गणेश मंडळांसाठी तीन फुटांपासून ते सात फुटांपर्यंत मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. त्याची किंमत ७ हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत आहे. पुणे, नाशिक, खेड, खेड शिवापूर येथील विक्रेते विक्रीसाठी होलसेल दराने घेऊन जातात.

गणेशोत्सवावर संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. कच्च्या मालाच्या वाढत्या महागाईमुळे मूर्तींच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवसाय म्हणून नाही तर यातून आनंद मिळतो आणि परंपरा टिकावी, आपले सण व उत्सव टिकावेत म्हणून आर्थिक नफा कमी असूनही हा व्यवसाय करत आहोत.
- मंगेश जाधव, मूर्तिकार, खोडद.
DAD25A01498

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT