खोडद, ता. २१ : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव उपबाजार समितीसाठी जागा खरेदी प्रकरणाच्या विरोधात गुरुवारी (ता. २१) जुन्नरमध्ये सर्वपक्षीयांनी व शेतकऱ्यांनी मोर्चा काढून या व्यवहाराबाबत निषेध व्यक्त केला.
नारायणगाव येथील उपबाजार समितीसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर येथे गुरुवारी सर्व पक्षीय व शेतकरी मोर्चा काढण्यात आला. जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जुन्नर बाजार समितीपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील नेते, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मोर्चा बाजार समितीच्या आवारात आल्यानंतर येथे निषेध सभा पार पडली.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम गाढवे, अंबादास डोके, बन्सी चतुर, दिलीप गांजाळे, अमोल भुजबळ, उत्तम काशीद, बाबा परदेशी, महेंद्र सदाकाळ, पंडित मेमाणे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, संभाजी काळे, मंगेश काकडे, शिवाजी वर्पे, संदीप गंभीर, गणपत डुंबरे, बाबा परदेशी, तानाजी केदार, मुकुंद भगत, शरद चौधरी, समीर भगत, अतुल भांबेरे, देविदास दरेकर, प्रवीण थोरात, सचिन वाळुंज, स्वाती ढोले, ज्योत्स्ना महाबरे, सुरेखा गांजाळे, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शांता यादव, बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, भास्कर गाडगे, प्रियांका शेळके, मोहन बांगर, नेताजी डोके, राम वाळुंज, शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, प्रसन्ना डोके, तानाजी तांबे, माजी सभापती रघुनाथ लेंडे यांची भाषणे झाली.
यावेळी बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके म्हणाल्या, ‘‘बाजार समितीने जागा वाजवी दरामध्ये न घेता रेडी रेकनरच्या अधिक पटीने फुगवून केलेला व्यवहार आहे. त्यामध्ये पारदर्शकता नाही. या व्यवहारात शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. पणन संचालकांनी दिलेली १२-१ च्या मंजुरी पत्रावर माझा वैयक्तिक आक्षेप आहे.’’
शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटे म्हणाले, ‘‘बाजार समिती जागा खरेदी प्रकरणात सभापतींएवढेच इतर संचालकही दोषी आहेत. त्यांनीदेखील पुढे येऊन याबाबत आवाज उठवायला हवा. बेकायदेशीर व्यवहार असल्याचे ग्रामपंचायती, सोसायट्या यांनी ठराव द्यायला हवेत.’’
बाजार समितीचे संचालक माउली खंडागळे म्हणाले, ‘‘बाजार समितीने खरेदी केलेल्या व्यवहाराला आमचा आधीपासूनच विरोध आहे. जमीन खरेदी रद्द होईपर्यंत थांबणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देणार आहोत.’’
भाजप नेत्या आशा बुचके म्हणाल्या, ‘‘काळे हे बाजार समितीचे सभापती झाले, हे दुर्दैव आहे. जागा खरेदी प्रकरणात संचालकदेखील तेवढेच जबाबदार आहेत. जीव गेला तरी चालेल, पण जमीन खरेदी प्रकरणात हा लढा शेवटपर्यंत देऊ.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.