पुणे

मांजरवाडीत बिबट मादी जेरबंद

CD

खोडद, ता.२९ : मांजरवाडी (ता.जुन्नर) येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता. २९)  सकाळी एक वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली, अशी माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

खंडागळे मळ्यात वावर असल्याने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंच संतोष मोरे यांनी केली होती. त्याची दखल घेत वनविभागाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली खंडागळे यांच्या शेतात केळीच्या बागेत वनविभागाने गुरुवारी (ता. २४) पिंजरा लावला होता. त्यात भक्ष्यही ठेवले होते. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती राजश्री खंडागळे यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ, पोलिस पाटील सचिन टावरे, ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे, संजय खंडागळे, स्वप्नील खंडागळे, सुखदेव खंडागळे, उपसरपंच संतोष मोरे, रेस्क्यू टीमचे सदस्य राम चोपडा, तुषार टेके, विलास खंडागळे, पपू खंडागळे यांनी पिंजरा माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यासाठी मदत केली. जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवले आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी बिबट मादी अडकल्यानंतर तिच्यासोबत असलेले दोन बिबटे पिंजऱ्याभोवती फिरत होते. तिला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. पिंजऱ्यात अडकलेला बिबट हा बाहेर फिरत असलेल्या बिबट्यांचा बछडा असावा, असा अंदाज वनखात्याकडून व्यक्त केला जात आहे. बछड्यासाठी त्याचे आई-वडील आक्रमक होऊ शकतात आणि या परिसरात धोका आणखी वाढू शकतो. म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
01617

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

Godavari River Flood : गोदामाय कोपली! गेवराईतील ३२ गावातील दोन हजारांहून अधिक कुटूंबियाचे स्थलांतर

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT