पुणे

काळमजाई मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा

CD

खोडद, ता. १७ : बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नर वनविभागाने हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील काळमजाई मळ्यात सोमवारी (ता. १७) पिंजरा लावला.
खोडद येथील कळमजाईमळ्यात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी सकाळी व सायंकाळच्या वेळी या भागात बिबट्याला मुक्तपणे संचार करताना पाहिले आहे. या परिसरात बिबट्याकडून पशुधनावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वनविभागाने या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत होती. ग्रामपंचायत सदस्य मनीष मोरडे यांनी जुन्नर वनविभागाकडे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी कळमजाई मळ्यात पिंजरा लावला. त्यासाठी मनीष मोरडे, रोहिदास नाडेकर, विकास भोर, श्रीकांत वायाळ यांनी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT