खोडद, ता. १ : आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत चालविल्या जाणाऱ्या हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवाचीजाळीतील श्री श्री ज्ञानमंदिर या शाळेमध्ये पालक सभा व बाल आनंद मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक गणेश थोरात यांनी दिली.
या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक माऊली भागवत तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी महालिंग मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्थानिक सेवा समितीचे अध्यक्ष तुषार देवकर म्हणाले की, ‘‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तणाव मुक्त व संस्कारक्षम शिक्षण पद्धती हवी, तसेच समाजाभिमुख शिक्षणाची गरज आहे.’’
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी व्यवहारिक ज्ञान, नफा तोटा, खरेदी विक्री, चलनी नोटा, नाणी ऑनलाइन चलन याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली, आइस्क्रीम, पार्लर, भाजीपाला, कडधान्ये, फळे, मसाले, कटलरी, शालेय स्टेशनरी व इतर खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. यावेळी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.