पुणे

ऊस पाचटापासून पर्यावरण संवर्धन

CD

खोडद/ आळेफाटा, ता. ८ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) गावातून मागील तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला पाचट व्यवस्थापनाचा उद्योग आज संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात अनुकरणीय रोल मॉडेल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथील महिला शेतकरी पुष्पा अमोल कोरडे यांनी वर्ष २०२२मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतर्गत राज्यातील पहिला राउंड बेलर खरेदी करून ऊस पाचट संकलन व व्यवस्थापनाचा उद्योग सुरू केला आहे. या उद्योगामुळे वायू प्रदूषणाला आळा बसण्यासाठी मदत होत आहे.
पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणीनंतर पाचट जाळल्यामुळे निर्माण होणारे हवाप्रदूषण, जमिनीची गुणवत्तेत घट, जैवविविधतेवर परिणाम व कार्बन उत्सर्जन या समस्यांवर या उपक्रमाने प्रभावी उपाय निर्माण झाला आहे. पंजाब, हरियाना राज्याच्या धर्तीवर बोरी बुद्रुक गावातून सुरू झालेल्या या पहिल्या प्रयोगामुळे पाचट जाळण्याऐवजी त्याचे शास्त्रीय पद्धतीने संकलन, साठवण व मूल्यवर्धन शक्य झाले आहे. यापूर्वी उसाच्या पाचटाच्या चौकोनी गाठीच्या निर्मितीसाठी चौकोनी गाठींचे मशिन वापरण्यात येत असे, यासाठी जास्त मनुष्यबळ लागत असल्याने मजूर टंचाईमुळे मोठ्या गाठीच्या (१५० ते ३०० किलो) मशिन वापरात येऊ लागल्या आहेत. पंजाब व हरियानाच्या धर्तीवर मागील तीन वर्षात सर्व अडचणींना तोंड देत कोरडे यांनी पाचट व्यवस्थापनाच्या संचाची जुळवाजुळव करून पाचट व्यवस्थापनाला जोड देणारी पुरवठा साखळी निर्माण केली आहे. एक एकरातील पाचटाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना एक एकरातील पिकांना कोरडे यांच्याकडून ड्रोनद्वारे औषध फवारणी करून दिली जाते.
महाराष्ट्रात प्रथमच राउंड बेलरच्या (पाचटाची गोल गाठली बनविणारे मशिन) साहाय्याने ऊस पाचटाच्या मोठ्या गाठी (१५० ते ३०० किलो) तयार केल्या जातात. यामुळे पूर्वी टाकाऊ समजल्या जाणाऱ्या पाचटापासून शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळू लागला असून, शेतीपूरक उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाचा सामाजिक व आर्थिक परिणामही लक्षणीय आहे. पाचट संकलन, बेलिंग, वाहतूक, साठवण व प्रक्रिया या सर्व टप्प्यांमध्ये स्थानिक युवक, शेतमजूर, शेतकरी सहाय्यता, उत्पादकता गटांना रोजगार संधी मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. पाचट न जाळल्यामुळे वायू प्रदूषणात घट, जमिनीवर सेंद्रिय कर्ब वाढ, मातीची जलधारण क्षमता सुधारणा व हरितगृह वायू उत्सर्जनात बचत होत आहे. यामुळे शाश्वत शेती, हवामान बदल अनुकूल व कार्बन यूटिलिटिच्या उद्दिष्टांना हातभार लागत आहे. पुणे येथील बायोफ्यूल सर्कल कंपनीच्या माध्यमातून पुष्पा यांनी उपलब्ध करून दिलेल्या जमिनीवर मागच्या वर्षी बोरी बुद्रुक बायोमास बँक सुरू झाली आहे.

विविध पुरस्काराने सन्मान
पुष्पा यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सकाळ अँग्रोवन शारदाताई गोविंद पवार पुरस्कार, महिला किसान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत. पुष्पा या महिला शेतकरी असून, जुन्नर तालुक्यातील पहिल्या ड्रोन पायलट देखील आहेत. या प्रकल्पात कृषी संचालक विनयकुमार आवटे, दीपक रेंगडे, उपविभागीय कृषिअधिकारी सुनील शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.

शेतकऱ्यांच्या शेतातून पाचट गोळा करून संकलन करण्याची क्षमता आता अडीच हजार टनापर्यंत गेली आहे. रोज सुमारे ६० ते १०० टन पाचट गोळा केले जाते. गोळा केलेल्या पाचटाचा उपयोग सीबीजी प्लांटमध्ये, पॅलेट, ब्रिकेट, सेंद्रिय खते बनविण्यासाठी होतो. भविष्यात पाचटाला मागणी व वापर वाढणार आहे. या कामातून ट्रॅक्टर चालक- मालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
- पुष्पा कोरडे, महिला शेतकरी, बोरी बुद्रुक

01881, 01882, 01883

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT