पुणे

करिअर नव्हे... माणूस घडविणारी खोडदची शाळा

CD

खोडद, ता. ८ : अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत चालला आहे. गरीब आणि मजुरांच्या मुलांची शाळा असा जिल्हा परिषद शाळांवर शिक्का पडत असतानाच काही उच्च अर्हता धारक, गुणवत्ताधारक व उपक्रमशील शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आता बदलत आहे. या अष्टपैलू शिक्षकांमुळे, नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळा मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत, विद्यार्थ्यांचा कल देखील जिल्हा परिषद शाळांकडे वाढत आहे.

सन १८ जून १८६९ रोजी खोडद (ता. जुन्नर) येथे स्थापन झालेल्या जिल्हा परिषद शाळेने अनेक सैनिक, डॉक्टर, अभियंते, सुजाण नागरिक, साहित्यिक घडविले असून सध्या या शाळेमध्ये राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, संगणक साक्षरता, डिजिटल तंत्रज्ञान शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता या गुणांच्या जोरावर खोडदमधील या जिल्हा परिषद शाळेने एक नावलौकिक निर्माण केला आहे.
खोडद जिल्हा परिषद शाळेचा सध्याचा पट १३० असून लहान शाळांमध्ये जास्त पट असणारी ही शाळा गुणवत्तेबाबत दक्ष आहे. एम्पथी फाउंडेशन व खोडद ग्रामस्थांच्या सहकार्याने अद्ययावत शाळेची इमारत उभी राहिली आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, कला क्रीडा महोत्सवात या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.शाळेच्या भौतिक विकासासाठी आजी माजी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केले असून ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, ग्रामविकास मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ व गावातील विविध संस्थांच्या सहकार्याने या जिल्हा परिषद शाळेने कात टाकली आहे.

शाळेतील उपक्रम -
• कराओके (ट्रॅक) संगीतमय परिपाठ
• सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा
• स्पीकवेल इंग्लिश
• भाषा-इंग्रजी- गणित अध्ययन समृद्धी
• आनंददायी शनिवार
• कला - क्रीडा महोत्सव
• किशोर, जीवन मासिकात लेख
• श्यामची आई कथामाला

डिजिटल इ अध्यापन -
• २५ संगणक असलेला अद्ययावत संगणक कक्ष
• प्रत्येक वर्गात स्मार्ट टी.व्ही.
• इ- लर्निंग प्रोजेक्टर
• इंटर ऍक्टिव्ह बोर्ड
• युट्यूब द्वारे लर्निंग

शाळेची वैशिष्ट्ये -
• सुसज्ज संगणक कक्ष
• जलशुद्धीकरण प्रकल्प.
• शालेय पोषण आहारा साठी परसबाग
• सुसज्ज ग्रंथालय
• भव्य लाल मातीचे क्रीडांगण
• दक्ष शाळा व्यवस्थापन समिती
• हँड वॉश स्टेशन
• चॉकलेस अध्यापन

उच्चअर्हता धारक शिक्षक :
या शाळेमध्ये मुख्याध्यापक रविराज गायकवाड, संजय रणदिवे, दीपाली वडनेरे, समीर भारती, वर्षा रणदिवे हे शिक्षक कार्यरत असून सर्व उच्च शैक्षणिक अर्हता धारक आहेत. सर्वांचे MS-ACIT हे AI चे नावीन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू आहे.शिक्षकांचे यु ट्यूब चॅनेल असून शाळेतील उपक्रमांना प्रसिद्धी दिली जाते. शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोधमध्ये आदर्श कामगिरी असलेले उपक्रमशील शिक्षक .

भविष्यातील योजना -
• विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी ''संगीत शाळा'' सुरू करणे.
• डिजिटल शिक्षणासाठी इटॅब सुविधा उपलब्ध करणे.
• जर्मन, फ्रेंच भाषा अध्यापन सुरू करणे.
• मल्लखांब, बॉक्सिंग, कुस्ती, धनुर्विद्या प्रशिक्षण.
• इंग्रजी हस्ताक्षर करसिव्ह रायटिंग सुरू करणे.
• LFW (लिफ फॉर वर्ड) इंग्रजी अध्ययन प्रोग्रॅम सुरू करणे
• एआय आधारित लर्निंग सुरू करणे

• लेखक - कवी आपल्या भेटीला उपक्रम सुरू करणे.
• अॅबॅकस शिक्षण सुरू करणे.
• ई - ग्रंथालय सुरू करणे.
• शिष्यवृत्ती विशेष वर्ग व स्पोकन इंग्लिश

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार :
• शाळेला पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक पुरस्कार
• पंचायत समिती जुन्नर आदर्श शाळा पुरस्कार
• पंचायत समिती जुन्नर आदर्श व्यवस्थापन समिती पुरस्कार
• सीएमश्री शाळा म्हणून निवड
• शिक्षकांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार
• पंचायत समिती जुन्नरचा गुणवंत शिक्षक पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही! भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय संताप

Malegaon Municipal Election : बोटावरची शाई आता इतिहासजमा! मालेगाव महापालिका निवडणुकीत वापरले जाणार १५०० मार्कर पेन

बाबो! पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’, कार पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी, viral video

International Trip: बजेटमध्ये इंटरनॅशनल ट्रिप हवीयं? 70 हजार रुपयांत फिरा ‘या’ 4 सुंदर देशांत

Crime: भयंकर! रात्री जेवणातून पालकांना झोपेच्या गोळ्या द्यायची; नंतर प्रियकरासोबत... आठवीतील मुलीचं भलतंच कांड, पण डाव कुठे फसला?

SCROLL FOR NEXT