पुणे

शिरोली येथे सांस्कृतिक कला महोत्सव

CD

खोडद, ता. ९ : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिरोली बोरी (ता. जुन्नर) येथे नुकताच सांस्कृतिक कला महोत्सव २०२६ हा कार्यक्रम पार पडला. या कला महोत्सवाला पालक व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, जुन्नर तालुक्यातील शिक्षक, रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिरोली बोरी व इंग्लिश स्कूल शिरोली बोरी व परिसरातील अंगणवाड्या यांनी सांस्कृतिक कला महोत्सव २०२६ चे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास वामन व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश शेळके यांनी दिली. कला महोत्सवात अनेक पारंपरिक व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने विविध गीतांचे व नात्याचे आयोजन केले होते. प्राथमिक शाळेच्या, माध्यमिक शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे म्हणाले, ‘‘अशा कला महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो. त्यामुळे असे कला महोत्सव विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिदायक असतात.’’
यावेळी पुणे जिल्हा वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. पंजाब कथे, नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, पंचायत समितीचे सदस्य संभाजी चव्हाण, शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, सरपंच प्रिया खिलारी, जयसिंग गुंजाळ, गणेश खिलारी, उपाध्यक्ष रवींद्र आगळे, किशोर मुळे, अजित खिलारी व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ तट्टू यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग जाधव, प्रतिक्षा खिलारी व वैष्णवी जाधव यांनी केले. हमीद पटेल यांनी आभार मानले.

02047

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT