पुणे

मांजरवाडीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा

CD

खोडद, ता.१२ : मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील गायकवाड मळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नर वनविभागाने बुधवारी (दि.११) पिंजरा लावला आहे, अशी माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

गायकवाड मळा येथे मंगळवारी रात्री बिबट्याने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. माजी सरपंच मनीषा मुळे, शुभम मुळे, संजय खंडागळे यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजऱ्यामध्ये भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली आहे. पिंजरा लावण्यासाठी आपदा मित्र सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे यांनी या ठिकाणी मदत केली.

रात्रीच्या वेळेस आपली स्वतःची व गोठ्यातील पाळीव जनावरांची काळजी घ्यावी तसेच या परिसरातून शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT