खोडद, ता. २३ : नारायणगाव येथील वीज वितरण कंपनीतील उपकेंद्रात ३३ केव्हीला सपोर्ट करणारी केबल जळाल्याने हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद व मांजरवाडी या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्रभर प्रयत्न करत होते.
रविवारी (ता. २२) सायंकाळी ६च्या सुमारास वीज वितरणच्या नारायणगाव उपकेंद्रात ३३ केव्हीच्या केबलने अचानक पेट घेतला. ही केबल पेटल्यानंतर तिच्या ठिणग्या तिला सपोर्ट करणाऱ्या केबलवर पडल्याने दुसरी केबल देखील जळाली. या दोन्हीही महत्त्वाच्या असणाऱ्या केबल जळाल्याने केबल बदलण्यासाठी सायंकाळी ६:३०वाजता हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद व मांजरवाडी या तीनही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, केबल बदलण्यात यश येत नसल्याने हिवरे तर्फे नारायणगावचा वीजपुरवठा नारायणगाववरून जोडून रात्री ९:३० वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तर खोडद आणि मांजरवाडी गावचा वीज पुरवठा सोमवारी (ता. २३) पहाटे ५ वाजता सुरळीत झाला.
हिवरे गावात सुमारे तीन तास तर खोडद आणि मांजरवाडीत तब्बल ११ तास वीज पुरवठा खंडित झाला होता, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. केबल जळाल्याने वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केबल बदलण्यासाठी व वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अथक प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.