पुणे

मांजरवाडी शाळेला जिल्हा अध्यक्ष चषक

CD

खोडद, ता. ७ : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील आदर्श मॉडेल स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकताच सन २०२५चा पुणे जिल्हा परिषदेचा जिल्हा अध्यक्ष चषक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा अध्यक्ष चषक पुरस्कार मिळाल्याने मांजरवाडी ग्रामस्थांनी शाळेच्या शैक्षणिक कामाविषयी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, विस्ताराधिकारी अशोक गोडसे, मांजरवाडीच्या सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच संतोष मोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण थोरात, अमोल थोरात, मनीषा मुळे, सुरेश मुळे, अशोक गायकवाड उपस्थित होते.
शाळेत राबवत असलेले विविध उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या व त्यात असणारे सातत्य, इस्रो व नासा यात निवड झालेले विद्यार्थी, रोबोटिक लॅब, डिजिटल क्लास रूम, शालेय परसबाग, आदर्श परिपाठ, १०० टक्के उपस्थिती, १०० टक्के पटनोंदणी, प्रगत विद्यार्थी, अद्यावत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शासकीय योजना १०० टक्के अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून शाळेतील सर्व अद्ययावत भौतिक सुविधा या सर्व बाबींचा विचार करून मांजरवाडी जिल्हा परिषद शाळेला अध्यक्ष चषक मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बेल्हेकर, शिक्षक सयाजीराव चिखले, बबनराव सानप, कमल वायाळ, साधना घाडगे, आशा पाटील, मीनाक्षी राऊत, सुरेखा नवले, अश्विनी काकडे, सीमा लांडे, तेजल खंडागळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT