पुणे

खोडदमध्ये वाद्यांच्या गजरात बैलांची मिरवणूक

CD

खोडद, ता. ११ : श्रावणी बैल पोळ्यानिमित्त खोडद (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. १०) बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. डिजेला फाटा देत संबळ, ताशा, सनई या पारंपारिक वाद्यांमध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जाणारा लेझीम खेळ यावेळी खेळण्यात आला.
खोडद गावातील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना अंघोळ घालून स्वच्छ केले होते.त्यांच्या कपाळावर कुंकू-हळदीचा टिळा लावून फुलांच्या माळांनी बैलांची सजावट करण्यात आली. त्यांच्या अंगावर झालर घातली. शिंगांना रंग लावून गोंडे बांधले होते. डोळ्यांना काजळ लावून, गळ्यात घुंगरमाळ आणि पुष्पहार घालून, बैलांच्या अंगाखांद्यावर गुलाल, भंडाऱ्याची उधळण करून बैलांना साजशृंगार करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली.
श्रावणी बैलपोळा साजरा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी खोडद येथे बैठक झाली. यामध्ये बैलजोड्या मिरवणुकीसाठी पहिल्या पाच मानाच्या बैलजोड्यांची लिलाव पद्धतीने  निवड करण्यात आली. निकिता गायकवाड, सुदाम गायकवाड, संतोष मुळे, पंढरीनाथ खरमाळे, रवींद्र वामन, रोहिदास डोके, सुजन घंगाळे यांनी बैलपोळा मिरवणुकीचे लिलाव घेतले होते. गुरुवारी सायंकाळी गावातील हनुमान मंदिरापासून बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. येथील चौकात मिरवणूक आल्यानंतर पारंपारिक पद्धतीने लेझीम खेळ खेळण्यात आला. लिलाव घेणाऱ्या बैल मालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ग्रामदैवत श्री जगदंबा मातेच्या प्रांगणात बैलांची मिरवणूक आणल्यानंतर देवीचे दर्शन घेऊन बैलपोळ्याची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

SCROLL FOR NEXT