पुणे

खोडदचे रमेश खरमाळे युनिटी मॅरेथॉनमध्ये अव्वल

CD

खोडद, ता. १६ : पुणे येथे आयोजित ‘बजाज पुणे युनिटी महा मॅरेथॉन’मध्ये खोडद (ता. जुन्नर) येथील ५१ वर्षीय शेतकरी रमेश पंढरीनाथ खरमाळे यांनी १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ५१ व्या वर्षीही त्यांनी राखलेली तंदुरुस्ती कौतुकाचा विषय ठरत आहे.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सुमारे ४१ हजार स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनमध्ये खरमाळे यांनी ४५ वर्षांवरील वयोगटात दहा किलोमीटरचे अंतर अवघ्या ४६ मिनिटांत पूर्ण केले.
रमेश खरमाळे हे शेतकरी असून त्यांची खोडद येथे दहा एकर शेती आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात २५० हून अधिक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून, त्यापैकी १७५ स्पर्धांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. २०२५ मध्ये त्यांनी एकाच वर्षात २७ मॅरेथॉन जिंकण्याचा विक्रम केला होता, तर २०२६ मध्ये आतापर्यंत १९ मॅरेथॉन जिंकून राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सुवर्णपदके मिळवली आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ते दररोज १५ किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण भागात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Phuket Fire Tragedy : प्रसिद्ध पर्यटनस्थळी मध्यरात्री भीषण आगीचा तांडव! १०० बाईक्सच्या इंधनामुळे भडका, ११ जणांचा होरपळून मृत्यू; भारतीय पर्यटकांबाबत मोठी अपडेट

IND vs NZ: मैदानावर अनेक खेळाडू होते, पण तिरंग्यासाठी धावला फक्त सिराज! video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Satara Politics: जो आपल्याला नडतो, त्याला सोडत नाही!’ मंत्री शिवेंद्रराजेंचे सूचक विधान; साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tur Crop: दुष्काळात कष्टातून फुलवले तुरीचे पीक! पाण्याचा केला काटकसरीने वापर; दोन एकरांत २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा

SCROLL FOR NEXT