पुणे

दौंड आत्महत्या प्रकरणातील सात आरोपी अद्याप फरारीच

CD

दौंड, ता. २३ : दौंड शहरात खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणारा तरुण व्यापारी विशाल दुमावत याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी फक्त दोन जणांना अटक केली आहे. तीन आठवड्यानंतरही या प्रकरणातील दोन महिलांसह एकूण सात संशयित फरारी आहेत.
दौंड शहरातील भांड्याचे व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत (वय ३७, रा. पंचायत समिती समोर, दौंड) याने कीटकनाशक घेतल्याने ४ फेब्रुवारी रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने चार वर्षात दुकानासाठी खासगी सावकारांकडून मासिक १० ते २० टक्के व्याजदराने तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. मुद्दल व व्याजाची रक्कम दिल्यानंतरही संबंधित महिला सावकारांसह अन्य सावकार आणखी पैशांची मागणी करीत रात्री दुकान बंद करण्यापूर्वी विशाल याच्या गल्ल्यातून पैसे काढून घेत होते. नकार दिल्यास त्याला दुकानातच मारहाण करत. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात विशाल याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलिमा गायकवाड, बाबू शेख, नाडी भैय्या, राजू सूर्यवंशी, मुन्नी काझी, टिल्लू काझी, निखिल पळसे, रूपेश जाधव व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी निखिल पळसे व रवी सॅमसन गायकवाड या दोघांना अटक झाली आहे. तर, उर्वरित संशयित फरारी आहेत.
विशाल याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईल संचात खासगी सावकारांचा नामोल्लेख करून त्यांच्याकडून झालेला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास व्हिडिओच्या माध्यमातून कथन केलेला आहे. परंतु, या प्रकरणाचा अत्यंत संथ गतीने तपास केला जात आहे.

आरोपी वाढण्याची शक्यता
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अटकेतील दोन संशयितांची येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे. या प्रकरणातील फरारी संशयितांचा शोध सुरू असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT