पुणे

दौंड बाजारात मूग ८८०० रुपये क्विंटल

CD

दौंड, ता. १० : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात मुगाच्या आवक आणि बाजारभावात वाढ झाली आहे. मुगाची १०३ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ८००० रुपये; तर कमाल ८८०० प्रतिक्विंटल, असा असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात मुगाची २४ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ७००० व कमाल ७७०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली आहे. परंतु, बाजारभाव तेजीत आहे. कांद्याची तब्बल १९ हजार ५२१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान २००; तर कमाल ११०० रुपये बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ४५० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १००; तर कमाल ३०० रुपये दर मिळाला. तालुक्यात लिंबाची १० डाग आवक झाली असून, प्रतवारीनुसार किमान ७०० व कमाल ९०१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला.
तालुक्यात कोथिंबिरीची १८ हजार २५५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ७०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ११७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ६०० व कमाल १४०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कलिंगडची १४३० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३०; तर कमाल १०० रुपये दर मिळाला. खरबुजाची १२४५ क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ६०; तर कमाल २०० रुपये दर मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो- १००, वांगी- १५०, दोडका- ३००, भेंडी- २५०, कारले- ४००, हिरवी मिरची- ३००, गवार- ६००, भोपळा- १२५, काकडी- १५०, शिमला मिरची- ४००, कोबी- १००.

कारली व कोबी महाग
दौंड मुख्य बाजारात कारल्याची ३२ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३००; तर कमाल ४०० रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात कारल्याची ४० क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १५०; तर कमाल ३०० रुपये दर मिळाला होता. कोबीची ४३५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ७० तर कमाल १०० रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात कोबीची ३५० क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५०; तर कमाल ७५ रुपये दर मिळाला होता.

शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू) कमाल (रू)
गहू ६६८ २००० २८५०
ज्वारी १७२ २००० ४२५०
बाजरी ०९३ १८०० ३१००
हरभरा ०९१ ३८०० ४६००
मका ०३३ १७०० २१००
मूग १०३ ८००० ८८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT