पुणे

लोकसभा मतदानासाठी दौंडमध्ये प्रशिक्षण

CD

दौंड, ता. २९ : बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. ७) होत असलेल्या निवडणुकीसाठी दौंडमध्ये मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
दौंडमधील राज्य राखीव पोलिस दलाच्या मंगल कार्यालयात दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. सहायक निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार शरद भोंग, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषी अधिकारी राहुल माने आदी यावेळी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य स्वीकृती करताना मिळालेल्या साहित्याची तपासणी करणे, नमुना मतदान प्रक्रिया, मतदानाच्या दिवशी करावयाच्या कामाविषयी माहिती देण्यात आली. मतदानाच्या दिवशी भरावयाच्या विविध अर्जाविषयी माहिती दिली. ज्या मतांना वैधरित्या आव्हान देण्यात आले आहे अशा मतांबाबत घ्यावयाची काळजी आणि प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांकडून प्रशिक्षणार्थींना इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्र आणि त्याची जोडणी, व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट), कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास अथवा बॅटरी खराब झाल्यास करावयाच्या उपाययोजनेसंबंधी माहिती देण्यात आली. गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी टपाली मतदानासंबंधी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT