पुणे

दौंडच्या निकालात यंदाही मुलींचेच वर्चस्व

CD

दौंड, ता. २१ : दौंड तालुक्यात बारावीच्या परीक्षेचा निकाल ९४. १८ टक्के निकाल लागला असून, नऊ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या ४२६२ विद्यार्थ्यांपैकी ४०१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ३४९ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य श्रेणी, १४४४ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी व १८७० विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. एकूण निकालात ९६.०८ टक्के मुली, तर ९२.६१ टक्के मुले उत्तीर्ण झाल्याने मुलींनी मागील वर्षाप्रमाणे निकालात वर्चस्व राखले आहे.
दौंड तालुक्यात बारावीच्या परीक्षेचा शेकडा निकाल यंदा ९४. १८ टक्के निकाल लागला असून, मागील वर्षी तो ९३.७५ टक्के इतका होता. तर, सन २०२२ मध्ये शेकडा निकाल ९७.३१ टक्के इतका होता. सलग तीन वर्षे मुलींनी बाजी मारली आहे.

दौंड तालुक्यात शंभर टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे : सेंट सेबॅस्टियन हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॅालेज दौंड, दत्तकला इंटरनॅशनल उच्च माध्यमिक विद्यालय स्वामी चिंचोली, कनिष्ठ महाविद्यालय नानगाव, मेरी मेमोरिअल उच्च माध्यमिक विद्यालय गिरीम, खांबेश्वर शिक्षण संस्था खामगाव, श्रीमती रंभाबाई कटारिया महाविद्यालय बोरीबेल, श्री मंगेश मेमोरियल लिंगाळी, अंबिका पब्लिक स्कूल पाटस व ब्राइट फ्यूचर इंग्लिश स्कूल खडकी.

शेकडा ९० ते ९९ टक्के निकाल असलेले महाविद्यालय : श्री गोपीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय वरवंड- ९९.५१, श्री फिरंगाई माता उच्च माध्यमिक विद्यालय कुरकुंभ- ९८.८६, सरस्वती शिक्षण संस्था रावणगाव- ९८.७९, मनोरमा मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय केडगाव- ९७.८०, श्री सद्गुरू उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव गाडा- ९७.२८, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय कानगाव- ९६.३९, न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव सालू- मालू- ९३.३३, कै. बा. वी. राजेभोसले उच्च माध्यमिक विद्यालय खानवटे- ९२.३०, श्री एन. टी. पवार कनिष्ठ महाविद्यालय सोनवडी- ९२, भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय खुटबाव- ९१.५८, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड- ९१.३१, जवाहरलाल विद्यालय केडगाव- ९०.६१, स्वर्गीय लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालय दौंड- ९०.१४.

शेकडा ८९ ते ७५ टक्के निकाल असलेले महाविद्यालय : स्वर्गीय मा. वि. भागवत महाविद्यालय पाटस- ८८.७०, नागेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पाटस- ८८.४६, कैलास शिक्षण संस्था राहू- ८७.५५, दिवंगत सुभाष बाबूराव कूल विद्यालय वाटलूज- ८७.५०, नवयुग माध्यमिक विद्यालय काळेवाडी- ८६.६६, दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड- ८६.२७, विद्या विकास मंदिर यवत- ८४.७४, मदरसा इमामदूल उलूम युसुफिया उच्च माध्यमिक विद्यालय दौंड- ८१.४९, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय देऊळगाव राजे- ८०, गुरूदेव दादोजी कोंडदेव उच्च माध्यमिक महाविद्यालय मलठण- ७८.९४, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय दौंड- ७७.४१, भैरवनाथ शिक्षण मंडळ भांडगाव- ७५.

व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा : दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड- १००, श्री गोपीनाथ विद्यालय वरवंड- ९६.९२, शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय दौंड- ९१.९३, एआयएसएसएमएस आयटीआय बोरीभडक- ८६.६६, कैलास विद्या मंदिर- ८३.३३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT