पुणे

दौंडमध्ये साडेतीनशे किलो गोमांस जप्त

CD

दौंड, ता. २ : दौंड शहरातून साडेतीनशे किलो गोमांसची वाहतूक केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक जीप जप्त केली आहे.
दौंड शहरातील नगर मोरी चौकात १ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना एका वाहनातून संशयास्पद मालाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ते वाहनांची तपासणी करीत होते. नगर मोरी चौकात सकाळी साडेअकरा वाजता पोलिसांनी एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप (क्र. एम.एच. २३ वाय. १८३७) थांबवून आत पाहणी केली असता त्यांना आतील पाच पोत्यांमध्ये ३५० किलो गोमांस आढळून आले. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिस अंमलदार निखिल जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मोहसीन नजीर पठाण (वय ४०, रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बोलेरो जीपसह एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT