पुणे

लग्न जमवायला आला दुचाकी घेऊन पळाला!

CD

दौंड, ता. ३ : दौंड शहरातील एका कुटुंबाची परिचिताकडूनच फसवणूक झाली आहे. लग्न जमविण्यास पुढाकार घेत घरात आलेल्या या परिचिताने एक दुचाकी वाहन आणि मोबाईल संच घेऊन पोबारा केला.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी माहिती दिली की, लखन झगडे (रा. पिंपरी, पुणे, पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) असे त्या परिचिताचे नाव आहे. दौंड शहरातील नरेंद्र दामोदर निकाळजे (रा. राज अपार्टमेंट, संस्कार नगरी, दौंड) यांचे लखन झगडे याच्याशी अल्प परिचय होता. १ जुलै रोजी दुपारी दीड वाजता लखन झगडे याने नरेंद्र झगडे यांच्या सदनिकेत जाऊन त्यांच्या मुलास पाहण्यासाठी एक कुटुंब येणार असल्याचे सांगितले. लखन झगडे याने स्वतःचा मोबाईल संच बंद असल्याचे कारण सांगत नरेंद्र निकाळजे यांचा मोबाईल संच मागून घेतला. त्यानंतर निकाळजे यांच्या विवाहेच्छू मुलाला पाहण्यासाठी आलेले कुटुंब एचडीएफसी बॅंकेच्या दौंड शाखेसमोर आल्याचे सांगत त्यांना सदनिकेचा रस्ता दाखविण्यासाठी लखन झगडे याने त्यांची दुचाकी मागितली. निकाळजे यांनी त्यांची होंडा कंपनीची काळा रंग असलेली शाइन मॅाडेल दुचाकी (क्र. एम.एच. १२ व्ही.डी. २४९९) दिल्यानंतर लखन हा त्यांच्या मोबाईल संचासह निघून गेला.
दरम्यान, बरीच वेळ वाट पाहिल्यानंतर लखन झगडे न परतल्याने नरेंद्र निकाळजे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी नरेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लखन झगडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT