पुणे

मुख्याधिकारी रजेवर, उपमुख्याधिकारी प्रशिक्षणाला

CD

दौंड, ता. १० : दौंड नगरपालिका कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी सतत रजेवर राहत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा सुरू झाल्यानंतरही नाममात्र गाळ काढण्याचे काम केल्याने थोड्या पावसातही रस्ते सांडपाण्याने वाहत आहेत. तसेच इतर अनेक समस्यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त आहेत.
नगरपालिका कार्यालयात वरिष्ठ अधिकारीच थांबत नसल्याने कनिष्ठ अधिकारी फक्त हजेरी लावून निघून जातात. नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणामुळे कमी दाबाने दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरात फक्त दर्शनी भागातच स्वच्छता केल्याचा आव आणला जात आहे. अन्य भागांमध्ये घंटागाडी आणि संबंधित कर्मचारी फिरकत देखील नाही. शहरातील पथदिवे बंद असतात आणि नादुरूस्त दिवे बदलण्याची मागणी करायची असल्यास संबंधित अधिकारी जागेवर नसतात. गटारी तुंबल्यावर तक्रार केल्यानंतर सवडीने दोन ते तीन दिवसानंतर नगरपालिकेच्या यंत्राने गाळ काढला जातो.
दौंड - गोपाळवाडी रस्ता, गजानन सोसायटी, सरपंच वस्ती, समतानगर, भीमनगर, साठेनगर, यादव वस्ती व अन्य भागांमध्ये थोड्या पावसानंतरच रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. सर्व प्रमुख चौक आणि आतील रस्त्यालगतच्या गटारींवर पायऱ्या, ओटे, टपऱ्या, बेकायदा बांधकामे करण्यात आल्याने त्याखालील गाळ काढता येत नाही. त्यामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी गटारीऐवजी मुख्य रस्त्यांवरून वाहत आहे. भाजी मंडई परिसरात तर गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत बाजारतळाकडे जात आहे. नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मुख्याधिकारी रजेवर आहेत व मी प्रशिक्षणासाठी बाहेर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT