दौंड, ता. १६ : दौंड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी १५०० मतदान अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील ३१० मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती
दौंडचे उपविभागीय महसूल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी ही माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार या वेळी उपस्थित होते. तालुक्यातील ३१० मतदान केंद्रांवर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार असून त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम तारीख असून त्या दिवशी निवडणूक लढविणारे उमेदवार निश्चित होतील. मतदान २० नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात संबंधित शासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या. मतदानासाठी एकूण १९ नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
मतदानाच्या आधी व मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याकरिता दौंड, यवत व कुरकुंभ पाटस येथे तीन भरारी पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर कासुर्डी, पाटस व दौंड शहर येथे तीन स्थिर पथके २२ ऑक्टोबर पासून कार्यरत होणार आहेत. २७ ऑक्टोबर पासून निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण सत्र दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच येथील मंगल कार्यालयात सुरू होणार आहे.
३१० पैकी १५५ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार असून या केंद्रांवर होणाऱ्या मतदानाचे थेट प्रक्षेपण नियंत्रण कक्षात पाहता येणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी दौंड शहरातील नगर मोरी येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे मतदार मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून (०२११७) २६२३४२ हा त्याचा संपर्क क्रमांक आहे.
मतदानाविषयी
- मतदान यंत्र वितरण व स्वीकृती - शासकीय धान्य गोदाम, नगर मोरी, दौंड
- एकूण मतदार : ३१५०४६
- स्त्री मतदारसंख्या : १५३२५२
- पुरुष मतदारसंख्या : १६१७८३
- तृतीयपंथी मतदार : ११
- निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकारी : २९
- मतमोजणी - शासकीय धान्य गोदाम, नगर मोरी, दौंड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.