दौंड, ता. ३ : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याप्रकरणी सोनवडी (ता. दौंड) येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ मोहन पवार (रा. सोनवडी, ता. दौंड) याने मतदानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता.
दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या दिवशी हा प्रकार घडला. सोनवडी येथील मतदान केंद्र क्रमांक २०५ मध्ये सोमनाथ याने बंदी असताना मोबाईल संच नेला होता. तसेच मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्याशी नजर चुकवून त्याने ज्या उमेदवारास मतदान केले त्याचे मोबाईल संचात व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर त्याने या मतदानाचे व्हिडिओ स्वतःच्या नावाने असलेल्या खात्यावरून समाज माध्यमांवर प्रसारित केले.
दौंड पोलिस ठाण्यात हवालदार निखिल जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सोमनाथ याच्याविरुद्ध मतदानाची गुप्तता भंग केल्याप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.