पुणे

परिचारिकेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

CD

दौंड, ता. ७ : दौंड शहरात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी घरी परतणाऱ्या परिचारिकेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आहे. ही घटना शहरातील डिफेन्स कॉलनी भागात घडली. दौंड पोलिस ठाण्यात सुनंदा ए. सोनवणे ( रा. डिफेन्स कॅालनी रस्ता, दौंड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सुनंदा सोनवणे या एका खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीस आहेत. शनिवारी (ता. ४) सायंकाळी पावणेसहा वाजता सोनवणे या नेहमीप्रमाणे घरी पायी परतत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्यानंतर भरधाव दुचाकीवरून दोघे पसार झाले. दोन्ही चोरट्यांचे अंदाजे वय ३० असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT