पुणे

कत्तलीसाठी आणालेल्या चार गायींची दौंडमधून सुटका

CD

दौंड, ता. ७ : दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या चार गायींची सुटका झाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणाऱ्या ११२ या क्रमांकावर या गायींविषयी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. दौंड शहरातील नगर मोरी ते रेल्वे उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील शांताई हॅाटेलच्या मागे झुडपात चार जानेवारीला चार गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्या होत्या. दौंड पोलिसांना ११२ या क्रमांकावरून माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तेथे तीन जर्सी व एक गावरान, अशा एकूण चार गायी कत्तलीसाठी आणलेल्या होत्या. पोलिसांनी त्या गायींची सुटका केली. दौंड पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार नीलेश चव्हाण यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार वाहिद बाबुमिया खान (रा. दौंड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाहिद खान याच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गायींची एका गोशाळेत रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

Pune Toxic Liquor: पुणे-पिंपरीतील विषारी दारूकांडाचा उगम उरुळीकांचन? स्थानिक तरुणाचा मृत्यू, भेसळ रॅकेटवर संशय तीव्र

SCROLL FOR NEXT