पुणे

दौंडच्या यात्रेनिमित्त मंगळवारपासून कार्यक्रम

CD

दौंड, ता. १८ : दौंड शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांच्या यात्रा उत्सवास मंगळवारपासून (ता. २२) सुरू होत आहे, अशी माहिती दौंडचे पाटील व माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी माहिती दिली.
दौंड शहरातील श्री काळभैरवनाथ- जोगेश्वरी माता मंदिर परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता मंदारबुवा गोखले यांचे श्री काळभैरवनाथ जन्माचे नारदीय कीर्तन होणार आहे. त्यानंतर मध्यरात्री १ वाजून ५८ मिनिटांनी देवजन्माचा सोहळा व जगदाळे पाटील कुटुंबीयांच्या हस्ते मानाची पूजा होईल. सकाळी जगदाळे पाटील कुटुंबीयांच्या हस्ते मूर्तीस अभिषेक करण्यात येईल. मंगळवारी रात्री आठ वाजता छबिना व पालखीच्या सवाद्य मिरवणुकीनंतर बाजारतळ येथे रात्री साडेदहा वाजता आतषबाजी केली जाणार आहे. त्यानंतर रात्री बारा वाजल्यानंतर पाटील चौकात दत्ता महाडीक पुणेकर यांच्या फडातील कलावंत लोकनाट्य तमाशा सादर करणार आहेत. बुधवारी सकाळी नऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत हजेऱ्या होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता गाववेशीसमोरील श्री चैतन्य मारूती मंदिर प्रांगणात इनामी कुस्त्यांचा फड आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री साडेनऊ वाजता पाटील चौकातील संगीत बारीत हिंदवी पाटील यांचे कला पथक हिऱ्याची हिरकणी’ सादर करणार आहे, अशी माहिती अॅड. निखिल गुरव यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT