पुणे

दौंड महिलेकडून एक किलो गांजा जप्त

CD

दौंड, ता. २७ : दौंड शहरातील रेल्वे हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून एक किलो गांजा जप्त केला आहे. रस्त्याच्या कडेला गांजा विक्री होत असताना मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून गांजा विक्रीप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, हुतात्मा चौकातून दौंड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेबी रूबेन राठोड (वय ६५, रा. भीमनगर, दौंड) ही महिला राजरोसपणे गांजा विक्री करत आहे. रेल्वे हद्दीत अतिक्रमण करून तिने खोली बांधून त्यामधून गांजा विक्री सुरू ठेवली होती. दौंड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्यासह पोलिस पथकाने सोमवारी (ता. २६) कारवाई करून झोपडीतून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरलेला १ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त केला.
या प्रकरणी पोलिस अंमलदार संजय कोठावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेबी राठोड हिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंगळवारी (ता. २७) प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. तिला गांजाचा पुरवठा करणाऱ्यांचा दौंड पोलिस शोध घेत आहेत.

अल्पवयीन ग्राहकांचा राबता
रेल्वेच्या हद्दीत खोलीत असलेल्या बेबी राठोड हिच्या गांजा अड्ड्यावर अल्पवयीन मुलांसह ज्येष्ठ नागरिक देखील नियमितपणे गांजा खरेदीसाठी येत असतात. अल्पवयीन मुले गांजाच्या पुड्या घेऊन तेथेच गांजा ओढत असतानाही रेल्वे प्रशासनाने कधी कारवाई केली नाही. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी सुरक्षा, रेल्वे परिसरातील अवैध कृत्यांवर लक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) देखील रेल्वे हद्दीतील या अड्ड्यावर कधी कारवाई केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT