पुणे

दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे नैराश्य चिंताजनक : आमदार कुल

CD

दौंड, ता. ३१ : ‘‘दौंड नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आमदार म्हणून विविध कामांकरिता उपलब्ध करून दिलेला निधीचा विनियोग झालेला नाही. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे नैराश्य चिंताजनक असून, त्यांच्या निष्क्रियतेचा मीच बाधित आहे,’’ अशी खंत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली.
दौंड शहरात पत्रकार परिषदेत राहुल कुल यांनी ही खंत व्यक्त केली. तहसीलदार अरुण शेलार, पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया या वेळी उपस्थित होते. राहुल कुल म्हणाले, ‘‘विधानसभा सदस्य म्हणून दौंड नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेला निधी विकासकामांकरिता वापरता आलेला नाही. पाठपुरावा करून मिळविलेला निधी नगरपालिकेने खर्च करावे, ही अपेक्षा आहे. परंतु, दौंड नगरपालिकेतील यंत्रणा त्याविषयी सक्रियपणे काम करीत नाही. नगरपालिकेचा अनुभव पाहता क्रियान्वयन यंत्रणा म्हणून दौंड नगरपालिका हद्दीतील विविध कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली. मात्र, यापुढे काळजी घेऊ. नगरपालिकेविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे.’’
‘‘दौंड उप विभागाचे प्रांताधिकारी व दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. या रिक्त पदांमुळे असुविधा होणार नाही, याविषयी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. आठवडाभरात नियमित बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर या रिक्त पदांवर नियुक्ती होईल. दौंड नगरपालिकेत मागील साडेचार वर्षात पाच मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नगरपालिका ‘अ’ वर्गात असताना ‘ब’ वर्गातील मुख्याधिकाऱ्यांची नावे पुढे आल्याने नियुक्तीस वेळ लागला आहे. मात्र, चार दिवसांत नवीन मुख्याधिकारी दौंडला येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT