दौंड, ता. ५ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक वाढली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाली. बाजरीची एकूण २५४ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान १९५० तर कमाल ३४०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढलेली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभावात तेजी आहे. केडगाव उपबाजारात चवळीची सोळा क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल किमान दहा हजार तर कमाल बारा हजार रुपये, असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ६४२ २२०० ३०५१
ज्वारी ०८९ २१०० ३२००
बाजरी २५४ १९५० ३४००
हरभरा ०५८ ४२०० ५४००
मका १०३ १७०० २२००
मूग ०४३ ७००० ७८९०
तूर ०२४ ५५०० ६२००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर ) : बटाटा - २००, आले - ३०० , गाजर - ३००, कैरी - १५०, काकडी - ३००, भोपळा - १००, कोबी - १५०, फ्लॅावर - १०००, टोमॅटो - ४००, हिरवी मिरची - ३००, भेंडी - ६००, कार्ली - ७१०, दोडका - ७५०, वांगी - ७००, शिमला मिरची - ४००, गवार - १३००, घेवडा - ७६०, बिट - २००, चवळी शेंग - ४१०, लिंबू - ५००.
कोथिंबिर, मेथी व शेपूच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ८४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १२०० रुपये , तर कमाल ४५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १५०० रुपये , तर कमाल २५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपुची ५९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल १६०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.
कांद्याची १३९८५ क्विंटल आवक
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून प्रतिक्विंटल चारशे रुपयांची घट झाली आहे. कांद्याची एकूण १३९८५ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान २०० रुपये ; तर कमाल १६०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची एकूण ४०४५ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये ; तर कमाल २२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.