दौंड, ता. १९ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची एकूण ७४ क्विंटल आवक असून, त्यास प्रतवारीनुसार किमान १८०० तर कमाल ३८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची १०७ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार किमान २००० तर कमाल ३५०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. यवत उपबाजारात भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून एकूण ८१५२ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल २२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ११२६० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० तर कमाल १५०० जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची १३९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल २५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
टोमॅटो, काकडी व कोबीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. टोमॅटोची १४५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ३५० रुपये असा दर मिळाला. काकडीची ६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ४०० रुपये असा दर मिळाला. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २०० रुपये असा दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.