दौंड, ता. २ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची एकूण ६३ क्विंटल आवक असून, त्यास प्रतवारीनुसार किमान २३०० तर कमाल ३६५० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव येथील उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली आहे. बाजारभावात तेजी आहे.
दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव येथे कांद्याची ५३०५ क्विंटल आवक होऊन कांद्यास प्रतवारीनुसार किमान ४००तर कमाल २२०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची २२३४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८५६० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १९०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ४१५ २३०० ३०५०
ज्वारी ०६३ २३०० ३६५०
बाजरी २५० २००० ३१५०
हरभरा ०४१ ४५०० ५४५०
मका १३४ १८०० २३००
तूर ०२० ५५०० ६१००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर ) : बटाटा-२००, आले-३००, गाजर- ३००, पेरू-२००, काकडी-३५०, भोपळा-२००, कोबी-२००, फ्लॅावर-३५०, टोमॅटो-२७५, हिरवी मिरची-४५०, भेंडी-६५०, शिमला मिरची-६५०, गवार-१६००, बिट-२००, डाळिंब - ६००, लिंबू -३००.
काकडी, टोमॅटो व मिरचीच्या भावात वाढ
दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. काकडीची ६८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ३५० रुपये असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोची १९७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २७५ रुपये बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.