पुणे

दौंड शहरात आरोग्य शिबिर

CD

दौंड, ता. ३ : दौंड शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान, आरोग्य शिबिर, मिरवणूक आदी उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावरील मोरे वस्ती येथील श्री गुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा येथे संगणक साहित्य आणि अण्णा भाऊ साठे यांची ग्रंथसंपदा वितरित करण्यात आली.
अद्विका फाउंडेशनच्या नीना जोसेफ यांच्या पुढाकाराने गिरीम हद्दीतील जाधववाडी शाळा, गुप्तेश्वर आश्रमशाळा व सोनवडी येथील आश्रमशाळेतील १०५ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. महात्मा गांधी चौकात आमदार राहुल कुल यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या शिबिरात विनामूल्य आरोग्य तपासणी करीत सवलतीच्या दरात विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. साठे नगर समाज मंदिरात प्रा. यशवंत गोसावी यांचे डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे जीवन, साहित्य व समाज क्रांती या विषयावर व्याख्यान झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात लहूजी शक्ती सेनेच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे, जिल्हाध्यक्षा संगीता बोराडे, मुख्याध्यापक दिलीप कुदाडे आदी उपस्थित होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महादेव ससाणे, उपाध्यक्ष मयूर तुपसौंदर्य, खजिनदार सोमनाथ आगलावे, आदींनी उपक्रमांचे संयोजन केले. तसेच जयंतीनिमित्त शहरातून सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT