दौंड, ता. २१ : दौंड तालुक्यात मुगाची आवक वाढली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल चारशे रुपयांची वाढ झाली आहे. मुगाची एकूण ३३७ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान ६९०० रुपये ; तर कमाल ९५०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली. बाजारभावात तेजी आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात डाळिंबाची ५६१ क्रेट आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो १५ ते ११० असा बाजारभाव मिळाला. दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १२७७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ५८५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ४०० तर कमाल ११०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
दरम्यान, केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून एकूण ९२१५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ४०० तर कमाल २००० प्रतिक्विंटल,असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ५१६ २२५० ३०२५
ज्वारी ०७५ २१०० ३२५१
बाजरी ३३३ १९०० ३०००
हरभरा ०३३ ४८५० ५९१०
मका ०१६ २००० २४००
तूर ०१८ ५००० ५७८२
मूग ३३७ ६९०० ९५००
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२००, आले-३५०, गाजर-३००, पेरू-२००, काकडी-२००, भोपळा -१२०, कोबी-६०, फ्लॅावर-१५०, टोमॅटो-३५०, हिरवी मिरची-७५०, भेंडी-२५०, कार्ली-३००, दोडका-२००, वांगी-२५०, शिमला मिरची-३००, गवार-५००, घेवडा-३००, बिट-२००, वाटाणा-८००, डाळिंब-६००.
भोपळा, कोबी व भेंडीच्या च्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात भोपळ्याची ४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ४० तर कमाल १२० रुपये असा दर मिळाला. कोबीची ८५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ३० तर कमाल ६० रुपये असा दर मिळाला. भेंडीची ४५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २५० रुपये असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.