पुणे

दौंडला ऑगस्टमध्ये १०८ टक्के पाऊस

CD

दौंड, ता. २९ : दौंड तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तब्बल १०८.९ टक्के पाऊस सहा दिवसांतच पडला आहे. तालुक्यातील बोरीभडक येथे १७.५ मि.मी., तर पारगाव येथे १३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.शुक्रवारीही ( ता. २८) सकाळी तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आणि दुपारी दोन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते.
दौंड तालुक्यात गुरुवारी (ता. २८) झालेला एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : देऊळगाव राजे- ६, पाटस- ८, यवत- ९.८, केडगाव- ७.५, राहू- १०.३, वरवंड- ८, दौंड- ६.३, बोरीभडक- १७.५, खामगाव- १३.५, वडगाव बांडे- ११, पारगाव- १३.८, बोरीपार्धी- ९.८, गिरीम- ८, कुरकुंभ- ८.
दौंड तालुक्यात मे महिन्यात सरासरी जेमतेम २०.९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र मे महिन्यात झालेल्या मुसळधार व संततधार अशा अवकाळी पावसामुळे तब्बल ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरी एकूण ९४.५ मिलिमीटर पाऊस होतो, यंदा मात्र एकूण ११४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सरासरी एकूण ६४.५ मिलिमीटर पाऊस होतो, यंदा मात्र एकूण ४८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी एकूण ९४.५ मिलिमीटर पाऊस होतो, यंदा मात्र २८ ऑगस्ट पर्यंत एकूण ५९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, दौंड शहरासाठी भीमा नदीची इशारा पूर पातळी ही ५०४ मीटर (१,५५,०७९ क्युसेक) असून, धोक्याची पूर पातळी ५०५ मीटर (१,५५,३८६ क्युसेक) आहे. दरम्यान २९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दौंडमधील नदीची पाणी पातळी ४९९.६१ मीटर (२१,८९२ क्यूसेक) इतकी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT