पुणे

दौंडमध्ये बाजरीची ७५० क्विंटल आवक

CD

दौंड, ता. १० : दौंड तालुक्यात बाजरीची आवक वाढली असून बाजारभावात १९० रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीची ७५० क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २००० तर कमाल ३००० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून एकूण ९७६६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीची १०८५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपुची ११५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. तर मेथीची ५१०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० तर कमाल १२०० रुपये जुडी,असा बाजारभाव मिळाला.
दरम्यान, केडगाव उपबाजारात डाळिंबाच्या आवक व बाजारभावात वाढ झाली आहे. डाळिंबाची १४६१ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १५१ रुपये बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रु.)
गहू ६४९ २३०० ३०००
ज्वारी ०८५ २१०१ ३५५१
बाजरी ७५० २००० ३०००
हरभरा ०५० ४६०० ५९१०
मका ०१४ २१०० २४००
उडीद ०८७ ५००० ६३००
तूर ०१५ ५००० ५५००
मूग १३१ ६१०० ८५००

टोमॅटो, भोपळा व काकडीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २४२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १७० रुपये बाजारभाव मिळाला. भोपळ्याची ४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १०० रुपये बाजारभाव मिळाला. काकडीची १४८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १०० रुपये बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT