पुणे

दौंडमध्ये निवडणूक प्रशिक्षणास ३६ अधिकारी गैरहजर

CD

दौंड, ता. २२ : ‘‘दौंड नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पार पडलेल्या अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणास तब्बल १५ केंद्राध्यक्ष व २१ मतदान अधिकारी गैरहजर राहिले आहेत. संबंधितांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली आहे,’’ अशी माहिती दौंड नगरपालिका निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.

निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे १६ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण झाले. दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावरील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचचे मंगलमूर्ती सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास तब्बल १५ केंद्राध्यक्ष आणि २१ मतदान अधिकारी गैरहजर होते. निवडणूक प्रशासनाकडून प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांना रीतसर नोटिसा देण्यात आल्या. परंतु फक्त त्यापैकी ६ अधिकारी यांनी नोटिशीला उत्तर देत खुलासा केला आहे. उर्वरित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी नोटिशीला उत्तर देण्याची तसदी देखील घेतली नाही.

निवडणूक कामासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती अधिनियम १९६५चे कलम ३१ (निवडणूक संबंधी अधिकृत कर्तव्याचा भंग करणे) अन्वये कारवाई प्रस्तावित केली आहे.
- नीलप्रसाद चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी

SCROLL FOR NEXT