दौंड, ता. २५ : दौंड शहरातील जिल्हा बॅंक शाखेत एका ज्येष्ठ शेतकऱ्याची रोकड लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सुरक्षारक्षकाच्या साह्याने पकडण्यात आले आहे. दौंड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सरफराज मन्नू इराणी ( वय ४८, रा. इराणी गल्ली, महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, सुदाम रंगनाथ कुदळे ( वय ५९, रा. नानवीज, ता. दौंड) हे शेतकरी बॅंकेत रोकड काढण्यासाठी आले होते. खात्यातून ९५ हजार रुपये काढल्यावर ती रोकड मोजत असताना त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या अनोळखी माणसाने रोकड मोजून देतो, असे सांगून बंडल हातात घेतला. परंतु हातचलाखीने त्याने एक नोट खराब असल्याचे सांगत बंडलमधील आठ हजार रुपये काढून घेतले. सुदाम कुदळे यांना नोटा कमी असल्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला थांबविले; परंतु तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बॅंकेच्या सुरक्षारक्षकाने त्याला पकडून ठेवले. पुढील तपास हवालदार अमीर शेख करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.