दौंड, ता. २७ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह यवत येथील उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात ज्वारीची एकूण ८६ क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रतवारीनुसार किमान २२५० तर कमाल ४८५१ प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. तर पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ झाली आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल शंभर रुपयांची घट झाली आहे. कांद्याची ९०९० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०२०० तर कमाल २१०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला.
दौंड बाजारात कोथिंबिरीची १८५३७ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० व कमाल १४०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८७७५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० तर कमाल २२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपुची ८०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल २००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची ६६६ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १२०० तर कमाल १४०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
-----
तालुक्यातील शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ६५३ २३०० ३३००
ज्वारी १०१ २२५० ४८५१
बाजरी ४८५ २००० ३५००
हरभरा ०२६ ४००० ५५५१
उडीद ०२३ ३५०० ५५००
मूग ००८ ६००० ७२९०
तूर ०१० ५१०० ५८१०
भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२१०, आले-४००, गाजर-४००, पेरू-१२०, काकडी-४००, भोपळा-३३०, कोबी-३००, फ्लॅावर-७००, टोमॅटो-४२५, हिरवी मिरची-६००, भेंडी-८००, कार्ली-७१०, दोडका-८००, घेवडा-७००, बिट-४००, डाळिंब-१२००, मका कणीस-१००, लिंबू-२००.
भोपळा, दोडका व भेंडीच्या दरात वाढ
लग्नसराईमुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. दौंड मुख्य बाजारात भोपळ्याची ११ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ३३० रुपये असा बाजारभाव मिळाला. दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ८०० रूपये, असा दर मिळाला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.