पुणे

दौंडमध्ये गव्हाच्या बाजारभावात घट

CD

दौंड, ता. ३ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गव्हाची ५४१ क्विंटल आवक आहे. त्याच्या बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १९९ रुपयांची घट झाली आहे. गव्हास प्रतवारीनुसार किमान २२०० तर कमाल ३१०१ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक आणि बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल शंभर रुपयांची घट झाली आहे. कांद्याची ९६९५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०२०० तर कमाल २२०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ९०९० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०२०० तर कमाल २१०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड बाजारात कोथिंबिरीची १६४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ८०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८१५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० तर कमाल २००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपूची २०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल १२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.

एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ५४१ २२०० ३१०१
ज्वारी १३९ १६०० ४६१०
बाजरी ४७६ १६०० ३४००
उडीद ००८ ३००० ५२००
मूग ००४ ६००० ७७००
तूर ००३ ५२०० ५९१०
हरभरा ०१५ ४५०० ५४००


भाजीपाला व फळांचा बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे दर ) : बटाटा-२००, आले-४००, गाजर-४००, पेरू-१५०, काकडी-२००, भोपळा-२२०, कोबी-२५०, फ्लॅावर-४००, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-५००, भेंडी-६१०, कार्ली-४००, दोडका-७००, वांगी-४००, घेवडा-५००, बिट - ३००, लिंबू - २००.

बटाटा, टोमॅटो व कोबीच्या दरात घट
बटाट्याची १८० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १८० तर कमाल २०० रुपये असा दर मिळाला. टोमॅटोची १७५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ३०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कोबीची ३५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २५० रुपये असा बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : पनवेलजवळ मालगाडीचे रुळावरून घसरण्याचे प्रकरण!

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT