पुणे

दौंड बाजारात गहू ३७५१ रुपये क्विंटल

CD

दौंड, ता. १८ : दौंड तालुक्यात गव्हाची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाची ३५१ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान २५०० रुपये, तर कमाल ३७५१ रुपये क्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची ३७१ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २३०० तर कमाल ३५५१ रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक आणि बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १०२९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८८५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० रुपये , तर कमाल १८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपुची १०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल १२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची २०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० रुपये, तर कमाल ११०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.


दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा- १८०, आले- ४००, गाजर- ३००, पेरू- २००, काकडी - २५०, भोपळा- २००, कोबी- २००, फ्लॅावर- ४००, टोमॅटो- ४००, हिरवी मिरची- ४५०, भेंडी- ७१०, कार्ली- ६००, दोडका- ७००, वांगी- ६००, शिमला मिरची- ६००, वटाणा- ६००, गवार- १६००, घेवडा- ४५०, बिट- ४००, मका कणीस- १७०, लिंबू- ३००.

बटाटा, मिरची व भेंडीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात बटाट्याची २६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १६० तर कमाल १८० रुपये, असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ५४ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ४५० रुपये, असा दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ४०० तर कमाल ७१० रुपये, असा दर मिळाला.

कांदा ३२०० रुपये क्विंटल
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून बाजारभावात मात्र प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल सातशे रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. कांद्याची ६६६७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०५०० रुपये ; तर कमाल ३२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ८९६० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०२०० रुपये ; तर कमाल २५०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

SCROLL FOR NEXT