पुणे

दौंडमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

CD

दौंड, ता. १४ : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० महिलांचा राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दौंड- गोपाळवाडी रस्त्यावरील सरपंच वस्ती येथील नगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ विरंगुळा केंद्र येथे सोमवारी (ता. १२) पार पडलेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे होत्या. अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवाई देवी मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रा. मेघा गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ यांची महती सांगत त्यांच्या गौरवपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेतला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि परिस्थितीवर मात करीत जिद्दीने पुढे आलेल्या दौंड तालुक्यातील सविता दत्तात्रेय मगर (पिंपळगाव), रोहिणी रमेश कुलकर्णी (पाटस), संगीता बबन भोसले (दौंड), सविता रामदास येडे (गार), प्रा. डॉ. शोभा बबन वाईकर (केडगाव), अनिता सुहास गायकवाड (दौंड), प्रणोती मंगेश चलवादी (दौंड), मंदा सोपान नांदखिले (बेटवाडी), अश्विनी विजय बगाडे (मसनेरवाडी) व रत्नमाला महादेव पासलकर (नानवीज) यांचा राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

04362

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: भीषण! ट्रक आणि एर्टिगा कारचा भयंकर अपघात; ६ महिलांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूक

Pakistan Cricket: भिकारड्या पाकिस्तानवर वाईट वेळ! क्रिकेट संघ काढला विक्रीला; लिलावाची केली घोषणा

Railway Accident : भीषण दुर्घटना! क्रेन रेल्ववर कोसळली; २२ जणांचा मृत्यू, ३० पेक्षा अधिक जखमी

Tamhini Ghat Crime : ताम्हिणी घाट खून प्रकरणातील फरार आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून बेड्या; लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई!

Paithan Black Marketing : युरियाची साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही; पाचोडमध्ये कृषी विभागाचा 'सर्जिकल स्ट्राईक'

SCROLL FOR NEXT