पुणे

ताम्हिणी घाट खून प्रकरणातील आरोपी ताब्यात

CD

दौंड, ता. १४ : ताम्हिणी घाटातील तरुणाच्या खून प्रकरणातील तीन संशितांपैकी एका फरारी संशयित आरोपीस पुणे लोहमार्ग पोलिसांनी धावत्या एक्सप्रेसमधून अटक केली.
याबाबत पुणे लोहमार्ग पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने माहिती दिली की, सोन्या उर्फ प्रज्वल संतोष हंबीर (वय २५, रा. खांदवेनगर, वाघोली, ता. हवेली) या संशयितास मंगळवारी (ता. १३) सायंकाळी लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. आदित्य गणेश भगत (वय २२, रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणी नगर, भोसरी, मूळ रा. चोभेपिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) याचा रविवारी (ता. ११) ताम्हिणी घाटात निर्घृणपणे खून करण्यात आला होता. घाटातील सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सणसवाडी गावच्या हद्दीत हा खून तिघांकडून करण्यात आला होता. याबाबत रायगड पोलिसांनी व्यापक शोध मोहीम राबवून आदित्य भगत याचे सहकारी अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. हिंगणे खुर्द, पुणे) व सोन्या उर्फ तुषार शरद पोटोळे (वय २४, रा. कर्वेनगर, पुणे) यांना अटक केली होती, तर तिसरा संशयित आरोपी सोन्या हंबीर हा फरार होता.
दरम्यान, मंगळवारी ( ता. १३) पुणे लोहमार्ग पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे सोलापूर- पुणे इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये शोध मोहीम राबविली. सोन्या हंबीर हा डी- ७ या प्रवासी डब्यातून सोलापूर ते पुणे असा प्रवास करीत असताना केडगाव (ता. दौंड) रेल्वे स्थानकावरून एक्सप्रेस जात असताना शिताफीने ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक दयानंद शरणार्थी, हवालदार आनंद वाघमारे, अंमलदार मनोज म्हेत्रे, गोकुळ हिवाळे व संदिप उसरे यांनी ही कारवाई केली. पुणे रेल्वे स्थानक येथे त्याला रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आर्थिक वादातून तीन मित्रांनी आदित्य भगत याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. आदित्य भगत याचा प्रवासी वाहने भाडतत्वावर देण्याचा व्यवसाय होता. माणगाव (जि. रायगड) पोलिस या खुनाचा पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांची संयुक्त कारवाई
आदित्य भगत खून प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर तिसरा संशयित सोन्या हंबीर फरार झाला होता. रायगड पोलिस, पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलिस व पुणे लोहमार्ग पोलिस दलाची विविध पथके एकाच वेळी त्याचा शोध घेत होते. सर्व शक्यता पडताळून शोध सुरू असताना सोन्या हंबीर हा इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आढळून आला. सोन्या हंबीर याला धावत्या एक्सप्रेसमध्ये ताब्यात घेताना सहप्रवाशांच्या जिवाला धोका होता व त्याचबरोबर तो पळून जाण्याच्या धोका होता. परंतु लोहमार्ग पोलिसांनी अतिशय नियोजनपूर्वक त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT