पुणे

नानवीज येथे महिला सुरक्षारक्षकांचे संचलन

CD

दौंड, ता. २१ : नानवीज (ता. दौंड) येथे राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या सत्र क्रमांक ७०चे दीक्षांत संचलन शनिवारी (ता. १७) समारंभपूर्वक पार पडले. यावेळी प्रशिक्षण सत्रात एकूण ४३३ महिला सुरक्षारक्षकांना कवायत व शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यासह विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे अधीक्षक राहुल श्रीरामे म्हणाले की, ‘‘राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या नवप्रविष्ठ महिला सुरक्षारक्षकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना राष्ट्राच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.’’ यावेळी राज्य राखीव पोलिस दल प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य जयश्री देसाई, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील तहसीलदार आशा होळकर, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र केंडे यांच्यासह डॉ. शरद शिंगाडे उपस्थित होते.
दीक्षांत संचलनाचे नेतृत्व सुरक्षारक्षक मानसी महेश गाढवे यांनी केले. राष्ट्रध्वजाला स्मरून नवप्रविष्ठांनी कर्तव्याची शपथ घेतली. आंतरवर्ग प्रशिक्षणात रूपाली गणेश नवघरे यांनी, तर बाह्यवर्ग प्रशिक्षणात कांचन भगवान सानप यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलिस निरीक्षक गणेश वायफळकर, लक्ष्मण तांदळे, हिरामण बनकर, सुनील ठोंबरे, आदींनी संयोजनासाठी सहकार्य केले. पोलिस निरीक्षक प्रफुल्ल खडपकर व तेजस काटम यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य सहदेव सानप यांनी आभार मानले.

04385

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

Bajaj Pune Grand Tour : २१ आणि २३ जानेवारीला वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

JEE Main 2026 : पुण्यात वाहतूक बदलामुळे जेईई मेन परीक्षार्थींना केंद्रावर पोचण्यासाठी आव्हान

Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

Pune Cycle Race: पुण्यातल्या सायकल स्पर्धेबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; स्पर्धकांच्या दिमतीला दोन विशेष पथके

SCROLL FOR NEXT