पुणे

दौंड तालुक्यात राष्ट्रवादी- भाजपमध्येच लढत

CD

दौंड, ता. २२ : राज्यातील महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने दौंड तालुक्यात स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने तालुक्यात या दोन पक्षातच मुख्य लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्षच भाजपमध्ये दाखल झाल्याने या पक्षाचे या निवडणुकीतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले आहे.
दौंड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने सर्व २१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना काही जागा लढवत आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने दौंड तालुक्यातील सहापैकी तब्बल पाच जागा जिंकल्या होत्या. तर, राष्ट्रीय समाज पक्षाने अवघी एक जागा जिंकली होती. बारा सदस्यीय दौंड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे ११ सदस्य व राष्ट्रीय समाज पक्षाचे १ सदस्य, असे बलाबल होते. यंदा पंचायत समितीच्या दोन व जिल्हा परिषदेची एक जागा वाढल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादीला आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करायचे आहे तर भाजपला कमळ फुलवायचे आहे, त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या दौंड नगरपालिकेची निवडणूक परिस्थिती अनुकुल असताना चिन्हावर न लढणारा भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मात्र सर्व जागा लढवत आहे.
दौंड तालुक्यात इच्छुकांची मोठी संख्या असल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॅार्म दिले. त्यामुळे काहीअंशी बंडखोरी थोपविण्यात यश आले. पंरतु नाराज झालेल्यांची समजूत काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे. पक्षनिष्ठा, संपर्क व मतदारसंघाची परिपूर्ण माहिती यापेक्षा ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष लावल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या काहींना उमेदवारी देण्यात आली आहे. बंडखोरी काही प्रमाणात थोपविली असली तरी ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यांच्या व समविचारी उमेदवारांच्या मदतीने क्रॅास व्होटिंग होण्याची शक्यता बळावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT