पुणे

दौंडमध्ये रोडरोलर चालकावर गुन्हा दाखल

CD

दौंड, ता. २३ : दौंडमध्ये जनता कॉलनी परिसरात बालकाच्या मृत्यू प्रकरणी भरधाव वेगाने रोडरोलर चालविणार्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोडरोलर खाली सापडून बालकाचा मृत्यू झाला होता.
दौंड पोलिसांनी शुक्रवारी (ता. २३) याबाबत माहिती दिली. सेंट सेबॅस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना गुरूवारी (ता. २२) दुपारी शिवालय अपार्टमेंट समोर रोडरोलर खाली सापडून आर्यन संतोष जाधव (वय ४) याचा चिरडून मृत्यू झाला होता. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी संतोष मारूती जाधव (मूळ रा. विजापुर, कर्नाटक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. रोलर फिरविताना रस्त्याकडे दुर्लक्ष करुन पाठीमागे न बघता परशुराम राठोड याने वेगात पाठीमागच्या दिशेने रोडरोलर चालवून आर्यन जाधव यास धडक बसली. यामध्येच चिरडून त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीनुसार रोडरोलर चालक परशुराम शंकर राठोड (रा. अंकलगा, ता जेवर्गी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरूध्द निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान जनता कॉलनी येथील रहिवाशांनी दौंड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. डांबरीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक बंद न करता आणि कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. रोडरोलर खाली सापडून मृत्यू झालेल्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी संबंधित कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व या दुर्देवी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी रहिवाशांनी केली. परंतु पोलिसांनी रोलर चालकावर गुन्हा दाखल करीत कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. रोडरोलर चालक फरार असून शुक्रवारी रस्ता डांबरीकरणाचे काम बंद होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT