पुणे

दौंड येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

CD

दौंड , ता. १ : रोटरी क्लब ऑफ दौंडकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ व्यक्ती आणि एका संस्थेला व्यवसाय गुणवत्ता व सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला.
दौंड शहरातील अॅशवूड मिशन रुग्णालय सभागृहात पार पडलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीराम डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन्स सेंटर फॉर मेंटल रिटार्डेशन्स या संस्थेकडून पासलकर वस्ती (लिंगाळी, ता. दौंड) येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन पुनर्वसनाचे कार्य केले जात आहे. विशेष मुलांसाठी दोन दशकांपासून कार्यरत या संस्थेला देण्यात आलेला विशेष सेवा गौरव पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भीमराव भंडारी यांनी स्वीकारला.
देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश अल्लमवार यांना केंद्रात होणाऱ्या प्रसूतींची संख्या वाढविणे, माता- बाल आहार व आरोग्य काळजी, वृक्ष संवर्धन आणि सस्मित सेवेकरिता विशेष सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. दौंड उपजिल्हा रुग्णालयात वर्ष २००१पासून शवविच्छेदन करणारे जीवक भोसले ऊर्फ बम्बईया यांचा क्लबकडून विशेष सत्कार करण्यात आला. निर्व्यसनी असणारे आणि कोणतीही आडकाठी न करता शवविच्छेदन करणारे बम्बईया यांना विशेष सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला.
देऊळगाव राजे येथील मनोज शांतिलाल गिरमकर, रोहन राजेंद्र गिरमकर व प्रणव तात्यासाहेब लगड या युवकांना कोणतीही पार्श्वभूमी नसताना परिश्रमाच्या बळावर नावारूपाला आणलेल्या व्यवसायाकरिता व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आवे. माळवाडी (ता. दौंड) येथील उद्योजक दिनेश सीताराम भागवत यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र व कापडी पिशवी, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ दौंडचे अध्यक्ष दीपक शासम, सचिव प्रज्ञा राजोपाध्ये, व्यावसायिक सेवा विभागाच्या क्षेत्रीय संचालिका पायल भंडारी, क्लब संचालक प्रमोद खांगल, डॉ. प्रा. संजय इंगळे, डॉ. मुकुंद भोर, हरिश्चंद्र ठोंबरे, डॉ. राजेश दाते, राकेश अग्रवाल, नवनाथ गोरे, अमिर शेख, उल्हास मिसाळ, मनिषा गोरे, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

संशोधक, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचा गौरव
रोटरी क्लब ऑफ दौंडकडून शेतकरी कुटुंबातील उद्योजक तथा औषधनिर्मिती क्षेत्रातील कुरकुंभ (ता. दौंड) येथील संशोधक डॉ. विष्णू बी. हलनोर आणि यवत (ता. दौंड) येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ तथा उद्योजक डॉ. विनोदकुमार पाटील यांचाही गौरव करण्यात आला.

04441

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT