दौंड, ता. १२ : दौंड रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे सव्वालाख रुपये मूल्य असलेले सोन्याच्या मंगळसूत्रासह पैंजण व रोकड असलेली पर्स चोरीस गेली असून अज्ञाताविरुद्ध दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुजाता जाधव (रा. दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर जाधव या शिक्षिका गुरुवारी (ता. ५) पुणे येथे जाण्याकरिता कुटुंबासह आल्या होत्या. दौंड - पुणे डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डीईएमयू)मध्ये प्रवेश करताना त्यांची चप्पल फलाटवरून खाली पडली. त्या दरम्यान झालेल्या गर्दीत चोरट्याने त्यांची पर्स चोरून नेली. त्यामध्ये ७ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, पैंजण, जोडवी, रोख तीन हजार रुपये होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, दौंड रेल्वे स्थानकाचे सर्व सहा फलाट, दोन्ही पादचारी पूल, तिकीट खिडकी, आरक्षण केंद्र, उद्वाहक व परिसरात गुन्हेगारी वृत्तीच्या काही कुटुंबांचा वावर व अहोरात्र वास्तव्य असताना रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना फलाटाचे तिकीट विचारणारे रेल्वे कर्मचारी या उपद्रवी लोकांकडे काणाडोळा करीत असल्याने त्यांनी रेल्वे स्थानकावर उच्छाद मांडला असून काही चोरटे अल्पवयीन मुलांचा प्रवाशांचे मोबाइल संच, लॅपटॉप, पर्स, बॅग, चोरीसाठी वापर करीत असून त्याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.