पुणे

दौंडमध्ये बेकायदा कत्तलखाने सुरूच

CD

दौंड, ता. २३ : दौंड शहरात शासकीय जागेत सुरू असलेले बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पोलिसांकडून धाडी टाकण्यात आल्यानंतरही हे कत्तलखाने सुरू असल्याने हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दौंड शहरात सोमवारी ( ता. २३) तहसीलदार अरुण शेलार व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी ही मागणी केली आहे. यावेळी गोरक्षणाचे कार्य करणारे अहिरेश्वर जगताप यांच्यासह अजय राऊत, सचिन जवळगे, अक्षय मुरकुटे, संकल्प पाटोळे, विकास शेंडगे, महादेव टकले, निखिल स्वामी, रुद्राक्ष लवटे आदी उपस्थित होते. राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०२४ला गायीला राज्यमाता - गोमातेचा दर्जा दिला आहे. तरीही दौंड शहरात मोठ्या प्रमाणावर गोहत्या सुरू आहे. शहरातील कसाई मोहल्ला, खाटीक गल्ली, ईदगाह मैदान व परिसरातील काटेरी झुडपांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड पोलिसांनी या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धाडी टाकून गोमांस जप्त करण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु दौंड नगरपालिका या कत्तलखान्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. गोहत्या केल्यानंतर रक्ताची व अनावश्यक मांसाची परिसरात व भीमा नदी पात्रात विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टोळीवर कारवाईची मागणी
दौंड शहर व परिसरात गोहत्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु तरीदेखील टोळीतील सदस्य दौंड शहरासह सोनवडी व लिंगाळी हद्दीत वेळ आणि जागा बदलून राजरोस गोहत्या करत असल्याने या टोळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT