पुणे

दौंड-पुणे रेल्वेचा विलंब टाळा

CD

दौंड, ता. २७ : दौंड-पुणे दरम्यान धावणाऱ्या स्थानिक गाड्यांचा दररोजचा विलंब दूर करून प्रवासी क्षमता वाढवावी, अशी मागणी दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. गुरुवारी (ता. २६) पुणे विभागीय व्यवस्थापक राजेश वर्मा यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि ज्येष्ठ नगरसेवक इंद्रजित जगदाळे उपस्थित होते. दौंडवरून सकाळी सुटणाऱ्या डीइएमयू, मेमू आणि बारामती-पुणे गाड्या सातत्याने विलंबाने धावत आहेत. यामुळे प्रवाशांच्या पुढील लोकल चुकतात, तसेच परतीच्या प्रवासातही लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्थानिक गाड्या थांबवल्याने प्रवाशांना दीड तासांचा विलंब सोसावा लागतो. प्रवाशांच्या तुलनेत रेल्वेचे रेक अपुरे असल्याने पाटस, केडगाव, यवत, उरुळी कांचन यांसारख्या स्थानकांवरील प्रवाशांना सलग पावणेदोन तास उभे राहून प्रवास करावा लागतो. यावर उपाय म्हणून आसन क्षमता वाढवण्यासाठी लवकरच चाचणी घेण्याचे आणि विलंब टाळण्याचे आश्वासन राजेश वर्मा यांनी दिले आहे.

उद्यान विकसित करण्याची मागणी
दौंड शहरातील रेल्वेच्या जागेतील बंद असलेले ''इंदिरा बालोद्यान'' पुन्हा विकसित करून तेथे सुशोभित उद्यान करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

Uttarakhand Holi: होळीच्या रंगात न्हाली देवभूमी,धामींची कोट्यवधींच्या प्रकल्पांची मोठी भेट पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन?

12th Student Death : नियतीचा क्रूर खेळ! बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा Heart Attack ने मृत्यू; परीक्षेपूर्वी 'असं' काय घडलं? हातात पेन घेण्यापूर्वीच...

SCROLL FOR NEXT