दौंड, ता. ३ : गोपाळवाडी (ता. दौंड) येथील ग्राम वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांनी या वाचनालयासाठी पुस्तके भेट स्वरूपात दिली.
गोपाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी वाचनालयाचे लोकार्पण सरपंच स्वाती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामसेवक झुंबर होळकर, शिवा व्हॅली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पवार, उपमुख्याध्यापक शरद दरेकर, प्रा. महेश माने, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण होले, शरद होले यांच्यासह सुरेश काळे, मयूरेश शिंदे, डॉ. दत्तात्रेय जगताप, ॲड. किशोर टेकवडे, पोपट भुजबळ, रघू सूळ, पांडुरंग लोणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचनालयासाठी गावात आठवडाभर राबविण्यात आलेल्या पुस्तक दान अभियानात ग्रामस्थांनी विविध प्रकारची पुस्तके भेट देऊन योगदान दिले आहे. या वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, संदर्भ पुस्तके, वृत्तपत्रे व मासिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.